dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ज्ञानगंगा अभयारण्यात ‘रणवीर’ ची एन्ट्री! 

बुलढाणा :  ज्ञानगंगा अभयारण्यात तिसऱ्या टी 3-सी 1 या नवीन नर वाघाचे नैसर्गिकरीत्या आगमन झाले आहे.  त्याला ‘रणवीर’ असे नाव देण्यात आल्याची माहिती आहे.  वन्यजीव संरक्षण, अधिवास विकास, अवैध चराई नियंत्रण आणि संवर्धनासाठी वन विभागाने गेल्या काही वर्षांत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या घटनेमुळे यशाची पावती मिळाली आहे.





वनसंवर्धनाचे  यश; अभयारण्यात तिसऱ्या वाघाचे आगमन 

बुलढाणा :  ज्ञानगंगा अभयारण्यात तिसऱ्या टी 3-सी 1 या नवीन नर वाघाचे नैसर्गिकरीत्या आगमन झाले आहे.  त्याला ‘रणवीर’ असे नाव देण्यात आल्याची माहिती आहे.  वन्यजीव संरक्षण, अधिवास विकास, अवैध चराई नियंत्रण आणि संवर्धनासाठी वन विभागाने गेल्या काही वर्षांत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या घटनेमुळे यशाची पावती मिळाली आहे.

    यापूर्वी ज्ञानगंगा अभयारण्यात पीकेटी 7-सीपी 1 हा ‘धुरंधर’ नावाचा वाघ आणि टी 163-एफएस1एफ या ‘मोना’ नावाच्या वाघिणीला अधिवासात मुक्त करण्यात आले होते. आता ‘रणवीर’ या नवीन वाघाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघांच्या अधिवासाला आणि जैवविविधतेला नवी चालना मिळाली आहे. विविध वनक्षेत्रांतून प्रवास करत अखेरीस ज्ञानगंगा अभयारण्याचा अधिवास स्वीकारणे, ही या क्षेत्रातील पर्यावरणीय सुधारणा आणि अधिवासाच्या अनुकूलतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे.  ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध चराईवर प्रभावी नियंत्रण, वन्यजीव संरक्षण, पाणवठ्यांची निर्मिती, अधिवास विकास आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच देव्हारी गावाच्या यशस्वी पुनर्वसनामुळे अभयारण्य क्षेत्राचा विस्तार होऊन वन्यजीवांना अधिक सुरक्षित, शांततापूर्ण आणि अनुकूल अधिवास उपलब्ध झाला आहे.

विशेष म्हणजे, “रणवीर”ने टिपेश्वर अभयारण्यातून गौताळा अभयारण्य आणि त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्य असा सुमारे 498 किलोमीटरचा प्रवास करून ज्ञानगंगेच्या अधिवासात प्रवेश केला आहे. त्याचा प्रवेश म्हणजे केवळ वन्यजीवांची हालचाल नसून, वन विभागाच्या सातत्यपूर्ण संरक्षण, संवर्धन, अधिवास व्यवस्थापन आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांना मिळालेली महत्त्वपूर्ण पावती आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य वन्यजीवांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि नैसर्गिक अधिवास म्हणून विकसित होत आहे. वाघांच्या नैसर्गिक भ्रमणासाठी आणि अधिवास विस्तारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. 

– यशवंत नागुलवार, विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top