dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बाळासाहेबांच्या छायाचित्राचा अवमान; उद्धवसेना आक्रमक 

वाशिम : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र शायना एनसी यांनी फाडल्याच्या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शायना एनसी यांच्या प्रतीकात्मक छायाचित्राला जोडेमारो आंदोलन

वाशिम : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र शायना एनसी यांनी फाडल्याच्या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आणि श्रद्धा आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या छायाचित्राचा अवमान करणे ही बाब शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी आणि निषेधार्ह असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी गुरुवारी एकत्र येत निषेध व्यक्त केला. संबंधित घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सार्वजनिक जीवनातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिकाही शिवसैनिकांनी मांडली.  यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ देवळे, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, उपजिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, विधानसभा संघटक पांडुरंग पांढरे, विधानसभा समन्वयक रवी पाटील, तालुकाप्रमुख गणेश इंगोले, तालुका संघटक आनंदा काळे, तालुका समन्वयक रमेश घुगे, शहर संपर्कप्रमुख गजानन भादुर्गे, शहरप्रमुख गजानन जोगदंड, शहर संघटक गणेश गाभणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रोहिणी गोरे, कल्पना गोरे,   नगरसेवक नामदेव हजारे, भावेश गोरे, नूर शेख, दीपक वानखेडे, दीपक इडोळे, शंकर सावके, दादाराव धनगर, गजानन मुसळे, पवन वाघ, विठ्ठल चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top