सिंदखेडराजा : सोयाबीनचे भुस घेऊन जाणारे ट्रॅक्टर अचानक उलटल्याने दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भोसा रस्त्यावर घडली. ऐन दिवाळीत दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जालना जिल्ह्यातील केल्हाळ वडगाव, ता. मंठा येथील माऊली अनंतराव दवणे वय २१ व महेश प्रकाश रणवीर हे सोयाबीनचे भुस घेऊन धांदरवाडीकडे जात होते. दरम्यान, भोसा रस्त्याजवळ अचानक ट्रॅक्टर उलटले. या भीषण अपघातात दोघांचाही दबून मृत्यू झाला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी प्रयत्नपूर्वक ट्रॅक्टर उचलून दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांचेही पार्थिव त्यांच्या मूळ गावी केल्हाळ वडगाव येथे पाठवण्यात आले.ऐन दिवाळीच्या आनंदोत्सवात गावातील दोन तरुणांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार गणेश सानप, श्रावण डोईफोडे आणि कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.