नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने ७ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी खासदारांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रोखल्याने मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने ७ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी खासदारांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रोखल्याने मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.

एसआयआर प्रक्रियेतील गोंधळाबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवरच आक्रमक भूमिका घेत सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन केले आहे. दिल्लीत बुधवारी विरोधकांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी विरोधकांना जंतरमंतरवर जाण्यापासून रोखल्यानंतर मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांनी बसेसच्या माध्यमातून जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदारांच्या या बसेस पोलिसांनी रोखल्यामुळे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी यांच्यासह सर्व विरोधी खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रियंका गांधी रस्त्यावर झोपल्या
जंतरमंतरच्या दिशेने जात असलेल्या बसेस पोलिसांनी थांबवल्यानंतर खासदार प्रियांका गांधी या आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. यावेळी प्रियांका गांधी या थेट रस्त्यावर झोपल्या. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेतले.