dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षक मतदारांनो, पसंतीक्रम नोंदवताना सावध रहा!

अमरावती  : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. त्यामुळे विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेऊन काळजीपूर्वक मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. 

पसंतीक्रमाचा घोळ नको; मतदानाचा हक्क बजावताना नियम विसरू नका 

अमरावती  : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. त्यामुळे विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेऊन काळजीपूर्वक मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. 

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेसोबत दिलेले जांभळ्या रंगाचे स्केचपेनच वापरणे बंधनकारक आहे. बॉलपेन, पेन्सिल किंवा अन्य कोणत्याही साधनाचा वापर करू नये. अन्य साधनाने पसंतीक्रम नोंदविल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते.

पहिली पसंती ‘१’ ने दर्शवा

मतदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमाच्या रकान्यात ‘१’ हा आकडा लिहून पहिली पसंती दर्शवावी. ‘१’ हा आकडा केवळ एका उमेदवारासमोरच असावा. मतपत्रिका वैध राहण्यासाठी पहिली पसंती नोंदविणे आवश्यक आहे. यानंतर मतदाराच्या इच्छेनुसार दुसरी, तिसरी व पुढील पसंती नोंदविता येते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येपुरते पसंतीक्रम देता येतील. मात्र, प्रत्येक उमेदवारासमोर वेगळा पसंतीक्रम असणे आवश्यक आहे.

पसंतीक्रम १, २, ३ अशा आकड्यांमध्येच नोंदवावा. ‘एक, दोन, तीन’ असे शब्द लिहू नयेत. आंतरराष्ट्रीय अंक, रोमन अंक, देवनागरी अंक किंवा संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील मान्यताप्राप्त भारतीय भाषेतील अंकांचा वापर करता येतो.

खूण किंवा स्वाक्षरी करू नका

मतपत्रिकेवर मतदाराने स्वतःचे नाव, आद्याक्षरे, स्वाक्षरी किंवा इतर कोणताही मजकूर लिहू नये. अंगठ्याचा ठसाही उमटवू नये. पसंतीक्रमासाठी √ किंवा X अशी खूण करण्याऐवजी केवळ अंकांचा वापर करावा. मतदाराची ओळख पटेल अशी कोणतीही खूण केल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते.

या चुका टाळा

‘१’ हा आकडा कोणत्याही उमेदवारासमोर न लिहिणे, एकापेक्षा अधिक उमेदवारांसमोर ‘१’ लिहिणे, ‘१’ कोणत्या उमेदवाराला दिला आहे याबाबत संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने तो लिहिणे किंवा एकाच उमेदवारासमोर ‘१, २, ३’ असे एकापेक्षा अधिक पसंतीक्रम देणे, या चुका टाळाव्यात. पसंतीक्रम शब्दांत लिहिणे किंवा जांभळ्या स्केचपेनऐवजी अन्य साधनाचा वापर करणेही टाळावे.

पहिली पसंती अनिवार्य; पुढील पसंती ऐच्छिक

मतदाराने आपल्या पसंतीच्या एका उमेदवारासमोर ‘१’ लिहिणे आवश्यक आहे. मात्र, दुसरी किंवा पुढील पसंती नोंदविणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर मतपत्रिका मिळाल्यानंतर घाई न करता सूचना समजून घेऊन पसंतीक्रम अचूकपणे नोंदवावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top