dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे बेकायदेशीर

मुंबई : कोणतीही पूर्वसूचना अथवा पत्र न देता अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तात्पुरते वेतन रोखणे बेकायदेशीर असून, वेतनाचा नवीन टॅब सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे वेतनाची पद्धत सुरू ठेवण्याची मागणी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी घेतली शिक्षण मंत्र्यांची भेट

मुंबई : कोणतीही पूर्वसूचना अथवा पत्र न देता अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तात्पुरते वेतन रोखणे बेकायदेशीर असून, वेतनाचा नवीन टॅब सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे वेतनाची पद्धत सुरू ठेवण्याची मागणी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

   राज्यात शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नवरात्र व दिवाळी सण तोंडावर आला आहे. अशा वेळी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा टॅब कोणतीही पूर्वसूचना अथवा पत्रक न काढता थांबवणे बेकायदेशीर आहे. संचमान्यतेचे निकष बदलून जाणीवपूर्वक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवले जात आहे. हा अन्याय असून वेतनाचा नवीन टॅब सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे वेतनाची पद्धत सुरू ठेवण्याची आग्रही मागणी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील व कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडे केली आहे.

शिक्षण मंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा 

माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर महिन्याचे पगार पत्रक न स्वीकारल्याने अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार मिळणार नाही. वेळेवर वेतन न झाल्यास गृह कर्जाचे हप्ते थकतील. तसेच दैनंदिन खर्चासाठी आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. म्हणून शिक्षण मंत्र्यांनी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top