dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘तुम्हीच धीर द्या’; मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची आर्त हाक

कामरगाव : पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ सप्टेंबर रोजी कारंजा तालुक्यातील मसला येथे शेतकरी देविदास काळे यांच्या शेताला भेट देत नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी केली.

‘सर्व पीक नष्ट झाले’; मसल्यात नुकसानग्रस्त सोयाबीनची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी

कामरगाव : पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ सप्टेंबर रोजी कारंजा तालुक्यातील मसला येथे शेतकरी देविदास काळे यांच्या शेताला भेट देत नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची व्यथा मांडली. ‘तुम्हीच धीर द्या, सर्व पीक नष्ट झाले आहे,’ अशी आर्त विनंती शेतकऱ्यांनी केली. सोयाबीन पिकासाठी मोठा खर्च झाला असून, पावसाअभावी उत्पादन हातचे गेल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी ‘कोरडा दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’ अशा घोषणाही दिल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, शेतीसाठी झालेला खर्च आणि अपेक्षित नुकसान याबाबत माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळाची परिस्थिती शासनाने गांभीर्याने घेतली असून, दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनाला प्राप्त झाले असून, आवश्यक उपाययोजनांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत पाणी, जनावरांचा चारा यांसह आवश्यक बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात येत असून, यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top