dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; आरोपी पती गजाआड

रिसोड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून व स्टॉलने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येवता-कोठा मार्गावरील शेत परिसरात घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिसात आरोपी पतीविरुद्ध २४ जून रोजी रात्री १० वाजेदरम्यान खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडाने मारहाण करून स्टॉलने आवळला गळा; येवता-कोठा मार्गावरील घटना

रिसोड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून व स्टॉलने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येवता-कोठा मार्गावरील शेत परिसरात घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिसात आरोपी पतीविरुद्ध २४ जून रोजी रात्री १० वाजेदरम्यान खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिला कविता रामेश्वर इंगळे (वय २७, रा. कोठा, ता. मालेगाव, ह.मु. बेलखेडा, ता. रिसोड) असे असून आरोपी पती रामेश्वर भास्कर इंगळे (वय ३०, रा. कोठा, ता. मालेगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता इंगळे या मागील दोन वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत असून बेलखेडा येथे माहेरी राहत होत्या. त्या ग्राम कोठा येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या आणि बेलखेडा येथून दररोज ये-जा करीत होत्या.  दरम्यान, आरोपी रामेश्वर इंगळे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्या माहेरी जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देत होता. “तू आमच्या गावात कशी नोकरी करते ते बघतो, तुला एक दिवस जिवे मारून टाकीन,” अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान येवता ते कोठा रस्त्यावरील बसंतीबाई अर्जुना इंगळे यांच्या शेताजवळ आरोपीने पत्नी कविता हिच्यावर दगडाने चेहऱ्यावर वार करून स्टॉलने गळा आवळत तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृत महिलेची आई रुख्मीना भीमराव ताजणे (वय ५५, रा. बेलखेडा) यांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक के. पी. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तायडे पुढील तपास करीत आहेत. सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक तायडे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top