dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जेवणासाठी बोलावले अन् केला खून; चौघांविरुद्ध गुन्हा

रिसोड : जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मृतकाच्या वडिलाच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी २१ जून रोजी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना १८ जून रोजी सायंकाळी पिंपरी सरहद्दीतील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ घडली.  

पिंपरी सरहद्दीतील घटना; उकीरखेड येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू 

रिसोड : जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मृतकाच्या वडिलाच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी २१ जून रोजी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना १८ जून रोजी सायंकाळी पिंपरी सरहद्दीतील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक विष्णू वाघ (वय २४, रा. उकीरखेड, ता. रिसोड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आनंद विनोद मवाळ, प्रतीक संतोष हुंबाळ, पवन गजानन दांदडे (सर्व रा. महागाव, ता. रिसोड) तसेच शुभम शेषराव अवचार (रा. अंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी विष्णू वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आनंद मवाळ याच्या वडिलांसोबत सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. तसेच आरोपी आनंद मवाळ हा अभिषेकला आपल्या वाहनावर काम करण्यासाठी येण्याचा आग्रह करीत होता. मात्र अभिषेकने त्यास नकार दिल्याने आरोपीने त्याला धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी १८ जून रोजी अभिषेकला जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगून पिंपरी सरहद्दीतील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ नेले. तेथे संगनमत करून कोणत्यातरी जड हत्याराने डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमी अभिषेकला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी व नंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे फिर्यादी रुग्णालयात असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.  या प्रकरणातील आरोपींना  अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरानखान पठाण करीत आहेत. सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक केशव वाघ, पोउपनि राहुल चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top