dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

निंभा गावात ‘अघोरी दरबार’ उधळला : चिमुकल्याच्या जीवाशी खेळ; अखेर स्वयंघोषित बाबावर गुन्हा दाखल 

मूर्तिजापूर : तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. देव-देवी अंगात येत असल्याचे भासवून अघोरी दरबार भरवणाऱ्या स्वयंघोषित चेतन महाराज मुळे याने थेट एका चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. देव-देवी अंगात येत असल्याचे भासवून अघोरी दरबार भरवणाऱ्या स्वयंघोषित चेतन महाराज मुळे याने थेट एका चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अत्यंत गंभीर अवस्थेत दिसत असून, त्याच्यावर कोणत्याही वैद्यकीय उपचारांशिवाय अघोरी पद्धतीने उपचार केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. या संतापजनक घटनेनंतर अकोला येथील बालकल्याण समितीच्या सदस्या प्रांजली जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री चेतन महाराज मुळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मोठमोठे आजार बरे करण्याचे आश्वासन देणाऱ्या या बाबाने लहान मुलांच्या उपचारासाठी वैद्यकीय पद्धतीऐवजी अघोरी मार्गांचा अवलंब केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच नोटीस बजावूनही निंभा गावात दर सोमवारी हा दरबार सुरूच असल्याची माहिती समोर आली होती. अखेर २२ एप्रिल रोजी पोलिसांनी कठोर कारवाई करत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, सहकलम जे.जे. अॅक्ट ७५ व अंधश्रद्धा निर्मूलन प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, अशा अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या जीवघेण्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top