dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाणा पोस्ट ऑफिसला दुसऱ्यांदा बॉम्बने उडवण्याची धमकी | Buldhana Post Office Threatened with Bombing

Buldhana Post Office Threatened with Bombing : बुलढाणा शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाणा पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दुसऱ्यांदा एका ईमेलद्वारे प्राप्त झाली असून, राज्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये हा मेल आल्याचे समजते.

Buldhana Post Office Threatened with Bombing

बुलढाणा: बुलढाणा शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाणा पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दुसऱ्यांदा एका ईमेलद्वारे प्राप्त झाली असून, राज्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये हा मेल आल्याचे समजते. बुलढाणा पोस्ट ऑफिसकडून शहर पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून, पोलिस सतर्क झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पहिला मेल हा ४ मार्चला आला होता तर दुसरा मेल २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाला. राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये हा मेल आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये, तब्बल १६ आरडीएक्स बॉम्बस्फोट होणार असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती. “तात्काळ सर्वांना बाहेर काढा” असा इशाराही मेलमध्ये देण्यात आला होता.
धमकीची गांभीर्याने दखल घेत पोस्ट प्रशासनाने तात्काळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व तज्ञांना पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसून “घाबरण्याचे कोणतेही कारण नाही” असे अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले. मात्र या एका मेलमुळे खळबळ उडाली आहे. पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे पोस्टमास्टर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top