dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई, अनेक पेट्रोल पंपावर लागल्या वाहनांच्या रांगा | Petrol Shortage in Chhatrapati Sambhajinagar District

Petrol Shortage in Chhatrapati Sambhajinagar District : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबतच्या अफवांनी अचानक उचल घेतल्याने  बुधवारी आणि गुरुवार, 26 मार्च रोजी सकाळपासूनच विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. 

जिल्ह्यात इंग्लंड टंचाई नाही, पेट्रोल पंप असोसिएशनचा दावा

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबतच्या अफवांनी अचानक उचल घेतल्याने  बुधवारी आणि गुरुवार, 26 मार्च रोजी सकाळपासूनच विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. आखाती देशांतील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा खंडित होईल, अशी भीती निर्माण झाल्याने अनेक वाहनचालकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली. परिणामी शहरातील प्रमुख पंपांवर सकाळपासूनच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. काही ठिकाणी साठा तात्पुरता संपल्याने वितरण बंद ठेवावे लागले, तर काही पंप दिवसभर बंद राहिल्याने उर्वरित पंपांवर ताण अधिक वाढला.

दरम्यान, इंधन पुरवठादार कंपन्यांनी टँकरसाठी आगाऊ बिल भरण्याची अट लागू केल्यामुळे काही पंपधारकांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, अधिकृत पातळीवर इंधनाची कोणतीही टंचाई नसून पुरवठा नियमित सुरू असल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top