dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

धमकीच्या ई-मेलनंतर पोलिसांची धावपळ: पोस्ट ऑफिसची कसून तपासणी | Police Scramble Following Threat Email

Police Scramble Following Threat Email : शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालय आरडीएक्स बॉम्बच्या सहाय्याने उडवून लावू असा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी चांगलीच धावपळ झाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जुना बाजार येथील पोस्ट ऑफिस कार्यालयाची अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने कसून तपासणी केली.

छत्रपती संभाजीनगर :  तुमच्या शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालय आरडीएक्स बॉम्बच्या सहाय्याने उडवून लावू असा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी चांगलीच धावपळ झाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जुना बाजार येथील पोस्ट ऑफिस कार्यालयाची अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने कसून तपासणी केली. या तपासणीत बॉम्बची केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला

तुमच्या शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालय आरडीएक्स बॉम्बच्या सहाय्याने उडवून लावू असा धमकीचा ई-मेल बुधवारी राज्यातील विविध पोस्ट कार्यालयांना आणि पोलिस यंत्रणेला प्राप्त झाला. छत्रपती संभाजीनगर पोस्ट ऑफिसला देखील बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल प्राप्‍त झाल्यानंतर सिटीचौक, गुन्हेशाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्युआरटी कमांडो पथकाने जुनाबाजार येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात धाव घेतली. पोलिसांनी पोस्ट ऑफिस कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून पोस्ट ऑफिस कार्यालयाची कसून तपासणी केली. कार्यालयात आलेल्या पार्सलची देखील यावेळी तपासणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्बची केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या घटनेची नोंद सिटीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून धमकीचा ई-मेल पाठविणाऱ्याविरुध्द सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याचे सिटीचौक पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top