खामगाव : शहरात ईदचा सण उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली आणि परस्परांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

खामगाव : शहरात ईदचा सण उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली आणि परस्परांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मौलवी यांनी मार्गदर्शन करतांना ईद सणाचे महत्व विशद केले. तसेच समाजात शांतता, एकता आणि परस्पर बंधुभाव जोपासण्याचे आवाहन केले. तर देशाच्या प्रगती, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना केली. सजनपुरी परिसरातही उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उपस्थित राहून नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र अहीरकर यांच्यासह नगरसेवक प्रविण कदम आणि इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उपस्थित राहून नागरिकांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत बंधुभाव आणि ऐक्याचे दर्शन घडविले. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता.
