खदानीत पुरला होता मृतदेह;  मुरुमातून उघडकीस आले गूढ; मृतदेहाचे तुकडे आणि नंतर आढळले पूर्ण शरीर

वाशिम : वाशिम-हिंगोली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान उघडकीस आलेल्या थरारक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खदानीत पुरून ठेवलेला मृतदेह मुरुमासोबत थेट रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, या प्रकरणात क्रूर हत्येचा संशय अधिक गडद झाला आहे.

वाशिम : वाशिम-हिंगोली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान उघडकीस आलेल्या थरारक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खदानीत पुरून ठेवलेला मृतदेह मुरुमासोबत थेट रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, या प्रकरणात क्रूर हत्येचा संशय अधिक गडद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोराळा परिसरातील खदानीतून मुरुम आणून तो बाजार समिती ते डम्पिंग ग्राऊंड दरम्यान टाकण्यात येत होता. मंगळवारी (१७ मार्च) रात्री जेसीबीच्या साहाय्याने मुरुम पसरवण्याचे काम सुरू असताना कामगारांना ढिगाऱ्यात मानवी पाय व हाताचा भाग आढळून आला. या घटनेने कामगारांसह परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हे अवयव एका पुरुषाचे असल्याचे निष्पन्न झाला. पोलिसांनी  बुधवारी (१८ मार्च) सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी शेजारील दुसरा मुरुमाचा ढिगारा उकरून काढण्यात आला असता, त्यामध्ये पूर्ण मृतदेह आढळून आला. त्यामुळे हा केवळ अपघात नसून नियोजनपूर्वक केलेले हत्याकांड असल्याची शक्यता अधिक बळावली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम शहर व ग्रामीण पोलीस पुरावे तपासत आहेत,  बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, 

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार संजय चौधरी व श्रीदेवी पाटील यांनी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. फॉरेन्सिक पथकानेही पुरावे संकलित केले आहेत.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

खदानीतच पुरला होता मृतदेह

प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीची हत्या करून मृतदेह खदानीत पुरण्यात आला होता. त्यानंतर त्याच ठिकाणाहून मुरुम उचलताना मृतदेहही त्यात मिसळला गेला आणि थेट महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »