dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकार हाय हाय, होश मे आओ.. होश मे आओ मोदी सरकार होश मे आओ अशा घोषणा देत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, 12 मार्च रोजी जिल्हाधकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीविरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकार हाय हाय, होश मे आओ.. होश मे आओ मोदी सरकार होश मे आओ अशा घोषणा देत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, 12 मार्च रोजी जिल्हाधकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीविरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या काही वर्षात सातत्याने गॅसच्या किंमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. सध्या अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युध्दाचा फटका भारताला बसला आहे. केंद्रसरकारने एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केल्याने घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 920 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच केंद्रशासनाने व्यावसायिक गॅस वितरणावर बंदी घातल्याने हॉटेल, खानावळ चालकांसह लघु उद्योजकांना त्याचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे घरगुती गॅस सिलेंडर बुकींगचा कालावधी वाढवला असल्याने सर्वसामान्य नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. केंद्रसरकारने वाढविल्याने गॅसच्या किंमती तात्काळ कमी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान मोदी, मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top