dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलडाणा येथील शासकीय महाविद्यालयाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली मागणी

बुलढाणा  :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्र देऊन केली आहे .

बुलढाणा  :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्र देऊन केली आहे .

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान आहे. त्यांच्या नावाने हे आरोग्य मंदिर उभे राहणे हा केवळ जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा गौरव असेल. तेव्हा बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नाव द्यावे अश्या मागणीचे पत्र केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मुख्यमंत्री जनभावनेचा आदर करून नक्कीच सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top