dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रंगोत्सवाच्या स्वागतासाठी वाशिम बाजारपेठ सजली:  डोरेमॉन ते स्पायडरमॅन पिचकाऱ्यांची क्रेझ; बाजारपेठेत उलाढाल

वाशिम : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील बाजारपेठ रंगांनी न्हाऊन निघाली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंग, पिचकाऱ्या, फुगे, बत्ताशे तसेच पूजन साहित्याची दुकाने थाटली असून खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाढली आहे. यंदा होळी गतवर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी आल्याने खरेदीचा हंगाम लवकरच सुरू झाला आहे.

शहरातील पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि रिसोड रोड परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून रंगसामग्रीची दुकाने सजली आहेत. सुरुवातीला खरेदी मंदावलेली दिसत असली तरी शनिवार-रविवारी सलग सुट्यांमुळे बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. रविवारी सकाळपासूनच नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले होते.  लहान मुलांमध्ये आकर्षक पिचकाऱ्यांची विशेष क्रेझ दिसून येत आहे. डोरेमॉन, छोटा भीम, स्पायडरमॅन, तसेच लांब अंतरापर्यंत पाण्याचा फवारा मारणाऱ्या गन-स्वरूपातील पिचकाऱ्यांना मुले आणि युवकांची मोठी पसंती मिळत आहे. विविध रंगछटांतील गुलाल, अबीर, सेंद्रिय रंग तसेच होळी पूजनासाठी लागणारे नारळ, लाकूड, बत्ताशे आणि किराणा साहित्याच्या खरेदीतही वाढ झाली आहे.  होलिकोत्सवाच्या स्वागतासाठी वाशिमची बाजारपेठ सजली असून रंगोत्सवाचा उत्साह शहरभर अनुभवायला मिळत आहे. व्यापाऱ्यांनाही या सणामुळे चांगल्या उलाढालीची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top