dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घनकचरा संकलनासाठी येणार विशेष डिझाईन असलेल्या 380 घंटागाड्या; कचरा संकलनाचे काम करण्यापूर्वीच नगरसेवकांकडून विरोध सुरु

छत्रपती संभाजीनगर :  महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा संकलन व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी गुजरातच्या वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीची निवड केली असून मार्चअखेर कंपनीचे शहरात काम सुरू होईल.

छत्रपती संभाजीनगर :  महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा संकलन व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी गुजरातच्या वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीची निवड केली असून मार्चअखेर कंपनीचे शहरात काम सुरू होईल. घंटागाड्यांसाठी पार्किंग, वॉशिंग, देखभाल दुरुस्ती आदींसाठी शेड उभारण्यात येत आहेत. घनकचऱ्याची वाहतूक करण्यासाठी विशेष प्रकारचे डिझाईन असलेल्या 380 घंटागाड्या लवकरच शहरात दाखल होणार आहेत.

शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या रेड्उी कंपनीला अपयश आल्यामुळे मनपा प्रशासनाने वेस्टर्न इमॅजिनरी या कंपनीची निवड केली. ही कंपनी अहमदाबाद, राजकोट, वडोदरा शहरांत काम करीत आहे. संबंधित शहरे शहर स्वच्छ भारत अभियानात देशात टॉप टेनमध्ये आहेत. दरम्यान, एका घंटागाडीचे प्रात्यक्षिक मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाहिले. कचरा संकलनासाठी कंपनी चारही बाजूने बंद असलेली आणि १२०० किलो क्षमतेची घंटागाडी वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीने आणली आहे. जमा झालेला कचरा सीलबंद पद्धतीनेच प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर क्यूआर कोड, घंटागाडीला जीपीआरएस सिस्टीम आदी कडक नियम मनपाने घालून दिले आहेत. शहरात १ एप्रिलपासून नवीन घंटागाड्या शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दरम्यान, वेस्टर्न इमॅजिनरी या कंपनीला सलीम अली सरोवर, हर्सूल, उल्कानगरी भागात भाजप नगरसेवक, जकात नाका येथे एमआयएमच्या नगरसेवकांकडून तसेच पडेगाव आदी भागांत विरोध झाला. पडेगावात तर स्लाटर हाऊस चालविणाऱ्या कंपनीने विरोध दर्शविला असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top