dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गोवंश तस्करी उघडकीस; साडे चार लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

मंगरूळपीर :कत्तलीसाठी नेले जात असलेले गोवंश गोभक्तांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगरूळपीर :कत्तलीसाठी नेले जात असलेले गोवंश गोभक्तांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हवालदार नितीन रवणे यांच्या तक्रारीनुसार, ३फेब्रुवारी रोजी प्रथमेश सुळे (रा. काळे फाईल, वाशिम), ज्ञानेश्वर परांडे (रा. जांभरून परांडे), विनोद वानखेडे (रा. पंचशील नगर, वाशिम) व महेश इंगळे (रा. काळे फाईल, वाशिम) यांनी महामार्गावरील वनोजा टोलनाक्याजवळ संशयास्पदरीत्या जात असलेले बोलेरो पिकअप वाहन थांबवले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वाहन व चालकास मंगरूळपीर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.संशयास्पदरीत्या थांबवलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. एम.एच. ४९ बी.झेड. ५०५८) वाहनातून गोवंश कत्तलीसाठी अकोला येथे नेले जात असल्याचे आढळले. वाहनचालक रोशन रमेश सोनुने (वय ३६, रा. कामठी, नागपूर) याला ताब्यात घेण्यात आले, तर त्याचा एक साथीदार पळून गेला.

वाहनाची तपासणी केली असता १० गोवंश जनावरे (किंमत अंदाजे १ लाख रुपये) व बोलेरो पिकअप (किंमत सुमारे साडे तीन लाख रुपये) जप्त करण्यात आले. कोणतीही वैद्यकीय व वाहतूक परवानगी नसताना, वाहन क्षमतेपेक्षा जास्त गोवंश कोंबून, उपाशी ठेवून व निर्दयतेने वाहतूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी चालक व फरार साथीदाराविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top