जिल्ह्यात अजितदादांच्या अस्थिकलशाचे श्रद्धेने दर्शन

वाशिम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश २ व ३ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी मंगरुळपीर येथे नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर वाशिम शहरातील पाटणी चौक येथे सकाळी ११.३० वाजता अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला.

या वेळी सर्व समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अस्थिकलशाचे श्रद्धेने दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

२ फेब्रुवारी रोजी अस्थिकलश वाशिम जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर कारंजा व मानोरा तालुक्यात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी मंगरुळपीर येथे तर त्यानंतर पाटणी चौक, वाशिम येथे शांत व शिस्तबद्ध वातावरणात दर्शन कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवर, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय व लोकहिताच्या कार्याचे स्मरण केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत अजितदादा पवार यांच्या विचारधारेवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. अस्थिकलश दर्शन कार्यक्रमामुळे पाटणी चौक परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »