dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अकोल्यात शहर सुधार समितीची सत्ता; महापौर शारदा खेडकर, तर उपमाहपौर अमोल गोगे विजयी

अकोला :  अकोला महापालिकेत शुक्रवारी महापौर, उपमापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपच्या उमेदवार शारदा खेडकर या महापौर पदी, उपमहापौरपदी अमोल गोगे यांचा विजय झाला.

महापौर शारदा खेडकर

अकोला :  अकोला महापालिकेत शुक्रवारी महापौर, उपमापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपच्या उमेदवार शारदा खेडकर या महापौर पदी, उपमहापौरपदी अमोल गोगे यांचा विजय झाला. त्यांना शहर सुधार समितीची ४५ मते मिळालीत. तर ठाकरे सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांना महाविकास आघाडीचे ३२ मते मिळाली आहेत. भाजपचे अपक्ष बंडखोर आशिष पवित्रकार यांनी अखेर भाजपला मतदान केले. तर एमआयएमचे तीन सदस्य तटस्थ राहिले.

उप महापौर अमोल गोगे

अकोला महापालिकेत महापौरपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट आला असून भाजपा आणि मविआ या दोघांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर  अकोला महापालिकेत भाजपचाच महापौरावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. अकोला शहराच्या विकासासाठी सोबत गेल्याचा राष्ट्रवादीचे म्हणणं आहे. यामुळे भाजपचे महानगरपालिकेतील बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि शारदा खेडकर महापौर बनल्या आहेत.

एमआयएमची तटस्थ भूमिका

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूकीत भाजपा आणि मित्र पक्षांच्या शहर सुधार समितीने भाजपाच्या महापौर उमेदवार शारदा खेडकर तसेच उपमहापौर उमेदवार अमोल गोगे यांच्या बाजूने मत दिले. तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) तसेच इतर विरोधक मित्र पक्षांनी शिवसेना (ठाकरे)च्या उमेदवार काळे यांना मत दिले. मात्र, या लढतीत एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top