‘अजित दादा’ अनंतात विलीन; पार्थ पवार यांनी दिला मुखाग्नी | शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार; लाखोंचा जनसमुदाय अऩ अजित दादा अमर रहेच्या घोषणा

बारामती :  महाराष्ट्राचे लोकनेते, लाडके दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार पंचतत्त्वात विलीन झाले. अजित पवार यांच्यावर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इममामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार, जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. 

बारामती :  महाराष्ट्राचे लोकनेते, लाडके दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार पंचतत्त्वात विलीन झाले. अजित पवार यांच्यावर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इममामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार, जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. 

लाखोंचा जनसमुदाय, अजित पवार अमर रहेच्या घोषणा अन् कुटुंबीय, नेते, कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश.. अशा भावुक वातावरणात अजित पवार यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरूवारी दुपारी १२:१५ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाती पर्वाचा आज अंत झाला. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. बुधवारचा दिवस अख्ख्या महाराष्ट्रासाठी दु:खद ठरला. बारामतीमध्ये प्रचारासाठी येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवार यांच्या निधनाची बातमी पसरताच बारामतीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शोककळा पसरली. पुणे, बारामतीसह प्रत्येक जिल्ह्यातील बाजारपेठा बंद झाल्या. त्यांच्या गावात काटेवाडीत चुलही पेटली नाही, प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत जणून घरातीलच व्यक्ती गेल्याची भावना व्यक्त करत होता.

अजित पवारांना अखेरची मानवंदना

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली. अजितदादांना निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळांसह सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. त्याआधी, अंत्ययात्रेत हजारो लोक उपस्थित होते. बारामतीचे रस्ते जाम झाले होते. गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »