dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्याजवळ ट्रॅव्हल्स बस आगीच्या भक्षस्थानी; चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप

जालना : पुण्याहून प्रवाशांना घेवून यवतमाळकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सचे टायर फुटल्याने भीषण आग लागून बस जळून खाक झाली. दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावर सेलगाव, ता.बदनापूर परिसरात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

 पुणे येथून चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (एमएच 29, ए डब्ल्यू 4444) प्रवाशांना घेवून यवतमाळकडे निघाली होती. ट्रॅव्हलमधील सर्व प्रवाशी पहाटे साखरझोपेत असतांना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील सेलगाव शिवारात एका पेट्रोलपंपाजवळ टायर फुटल्याने ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. हा प्रकार चालक भीमराव घोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. आरडाओरड करून प्रवाशांना खाली उतरण्याचे सांगितले. आगीची भीषणता लक्षात आल्यावर घाबरलेले प्रवाशी सुखरूप खाली उतरले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याचे समजताच जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात येवू शकली नाही. घटना कळताच बदनापूर पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत बसचा पूर्णपणे जळून खाक झाली होती. या भीषण घटनेत टॅव्हल्समधील सर्व 27 प्रवाशांचा जीव वाचला, जवळच्या बॅगा, किमती सामान मात्र आगीच्या भक्षस्थानी गेले. या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top