जाफ्राबाद : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या नदी, नाले, ओढ्यातून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन त्याची दिवसाढवळ्या वाहतूक करण्यात येत असून त्याकडे महसूल आणि पोलिस प्रशासन विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

वाळू माफियांनी तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या, नाले आणि ओढ्यातून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन त्याची विक्री करण्याचा गोरख धंदा सुरु केला आहे. नदीपात्रातून दिवसाढवळ्या बोटी, जेसीबी, पोकेलेन सहाय्याने वाळू उपसा करुन त्याची वाहतूक करण्यात येत आहे. वाळू माफियांकडे तालुक्यातील महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व पोलिस चिरीमिरी घेऊन कारवाई करीत नसल्याचा आरोपही नागरिकांतून करण्यात येत आहे. वाळू माफियांवर महसूल आणि पोलिस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांतून करण्यात येत आहे.
दरम्यान, जाफ्राबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात आमच्या कारवाया सुरू आहेत. गेल्या काही दिवसात वाळू माफियांवर 12 वेळेस कारवाई करण्यात आली. तर अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर चार ते पाच वेळा कारवाई केली असल्याची माहिती जाफ्राबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली. तसेच वाळू माफियांविरुध्द लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.