भाजपाकडून महापौरपदासाठी शारदा खेडकर, तर उपमहापौरपदासाठी अमोल गोगे यांचे नामांकन दाखल

अकोला : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने शहर सुधार समीतीतर्फे भाजपाने महापौर पदासाठी शारदा खेडकर, तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांचे नामांकन दाखल करण्यात आले आहे.   

महापौर उमेदवार –  शारदा खेड्कर

अकोला : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने शहर सुधार समीतीतर्फे भाजपाने महापौर पदासाठी शारदा खेडकर, तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांचे नामांकन दाखल करण्यात आले आहे.   

उपमहापौर उमेदवार – अमोल गोगे

भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नामांकन सोहळा पार पडला.  यावेळी विजय अग्रवाल, जयंत मसणे, संतोष शिवरकर, सुनील मेश्राम, उषाताई वीरक, चांदभाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, मंडल पदाधिकारी तसेच शहर सुधार समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी अकोला महानगर हे आपले कुटुंब असून, या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच आमची परंपरा असल्याचे सांगितले. शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास व सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »